लातूर जिल्ह्यात 198 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, बाधितांचा आकडा 5 हजारांच्या जवळ पोहोचली

875

लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात पुन्हा 198 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 4894 वर पोहोचली आहे. आज उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आजपर्यंत जिल्ह्यात 163 जणांचा मृत्यू झाला आहे.

खुशखबर! देशातील कोरोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी

लातूर जिल्ह्यात सुरू असलेले कोरोनाचे थैमान कमी होण्याचे चिन्ह दिसून येत नाही. जिल्ह्यात नवीन 198 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील 2614 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या 2117 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यामध्ये 70 वर्षाचा पुरुष समता नगर उदगीर , 65 वर्षाचा पुरुष दापका तालुका निलंगा व 50 वर्षाचा पुरुष क्वाईल नगर लातूर यांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 163 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या