Latur News – लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळापैकी 29 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी

लातूर जिल्ह्यावर यावर्षी निसर्ग कोपला आहे. भर उन्हाळ्यात अगोदर प्रचंड पाऊस झाला. पुन्हा काही दिवस रिकामे गेल्यानंतर सुरू झालेल्या पावसाने लातूर जिल्ह्यातील शेतीचे क्षेत्र निस्तनाबूत केले. आता पुन्हा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या पावसाने जिल्ह्यातील तब्बल 60 महसूल मंडळापैकी 29 महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली आहे. बोरोळ महसूल मंडळात 163 मिलीमीटर तर पोरेगाव रेनापुर महसूल मंडळात 157 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसाने लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण केली असून शेतशवारांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.

लातूर जिल्ह्यात 28 रोजी सायंकाळी पावसाचे आगमन झाले रात्रभर सुरू असलेला पाऊस सकाळी थांबला. मात्र दिवसभर ढगाळ वातावरण असून पाऊस केव्हाही परत येऊ शकतो अशी स्थिती निर्माण झालेली आहे. सकाळी आठ वाजता संपलेल्या मागील 24 तासात लातूर जिल्ह्यात तब्बल 62.6 मिलिमीटर पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यात मागील 24 तासात तालुका निहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. लातूर तालुका 56.5 मिलिमीटर ,औसा तालुका 27.4 मिलिमीटर, अहमदपूर तालुका 64.5 मिलिमीटर ,निलंगा तालुका 64.4 मिलिमीटर, उदगीर तालुका 52 .6 मिलिमीटर, चाकूर तालुका 60.3 मिलिमीटर , रेनापुर तालुका 126.8 मिलिमीटर, देवणी तालुका 107.5 मिलीमीटर, शिरूर अनंतपाळ तालुका 64.5 मिलिमीटर तर जळकोट तालुक्यात 31.1 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

29 महसूल मंडळात झाली अतिवृष्टी

लातूर जिल्ह्यातील तब्बल 29 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये लातूर महसूल मंडळात 88 मिलिमीटर, बाभळगाव महसूल मंडळात 88 मिलिमीटर, कासारखेडा महसूल मंडळात 90.3 मिलिमीटर, अहमदपूर व खंडाळी महसूल मंडळात 73 मिलिमीटर, किनगाव महसूल मंडळात 73.5 मिलीमीटर अंधेरी महसूल मंडळात 73 मिलिमीटर निलंगा महसूल मंडळात 72.5 मिलिमीटर महसूल मंडळात 72 मिलिमीटर औराद शहाजनी महसूल मंडळात 65.5 मिलिमीटर, कासार बालकुंदा महसूल मंडळात 70.5 मिलिमीटर अंबुलगा महसूल मंडळात 69.3 मिलिमीटर हलगरा महसूल मंडळात 74.3 मिलिमीटर महसूल मंडळात 72 मिलिमीटर उदगीर महसूल मंडळात 75.5 मिलिमीटर मोघा महसूल मंडळामध्ये 75.5 मिलिमीटर, हेर महसूल मंडळामध्ये 73.5 मिलिमीटर, तोंडार महसूल मंडळात 75.5 मिलिमीटर , झरी महसूल मंडळात 72 मिलिमीटर, रेनापुर महसूल मंडळात 157.3 मिलिमीटर, पोहरेगाव महसूल मंडळात 157.8 मिलिमीटर, पानगाव महसूल मंडळात 128.3 मिलिमीटर, कारेपूर महसूल मंडळात 72 मिलिमीटर, पळशी महसूल मंडळात 118.8 मिलिमीटर , देवणी महसूल मंडळात 108.8 मिलिमीटर, बोरोळ महसूल मंडळात 163 मिलिमीटर तर हिसामाबाद महसूल मंडळात 81.3 मिलिमीटर पाऊस झाला आहे.