
लातूर शहरातील विशालनगर भागातील साई मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे एमआयडीसी येथे दाखल असलेल्या साई मंदिरातील दानपेटी फोडून चोरी प्रकरणातील संशयित आरोपी बार्शी रोड लगत इदगाह मैदानाच्या परिसरातील लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्या त्याने आपले नाव गणेश श्रीकांत साळुंखे (वय -22, रा.कैलास नगर, लातूर) सांगितले आणि गुन्हाही कबूल केला. साई मंदिरातील दोन दानपेटी फोडून त्यामधील काही रक्कम आपल्याजवळ ठेवून उर्वरित रक्कम एका बॅगमध्ये ठेवून सदरची बॅग मित्र विनायक भाऊसाहेब पवार (रा. भामरी चौक, नांदगाव रोड,लातूर) यांच्याकडे दिल्याचे आरोपीने सांगितले.
दरम्यान, सदरच्या चोरीमधील चोरलेली रक्कम 10 हजार जप्त करण्यात आली असून आरोपीविरोधात कलम 457, 380 भा.द.वि. अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.






























































