लातूर – महिलेवर चाकूने वार करुन लुटले, रेणापूर तालुक्यातील मौजे कामखेडा येथे दोन घरात चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेनापुर तालुक्यातील मौजे कामखेडा येथे अज्ञात दोन चोरट्यांनी घरातील इतर खोल्यांना बाहेरून कडी लावून महिलेवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले . त्यानंतर त्यांनी दोन घरातील 29 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले. सदरील चोरी प्रकरणी संतोष लक्ष्मण पोतले यांनी तक्रार दिली आहे.

पहाटे तीनच्या सुमारास आम्ही घरात झोपलो असताना. वहिणी वनिता यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने मी माझ्या रुममधुन बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र माझ्या रुमचा दरवाजा बाहेरून कडी लावलेला असल्याने मला बाहेर जाता आले नाही. नंतर वहिणी वनिता यांनी माझ्या रुमचा तसेच घरातील दुसऱ्या दोन रुमचा दरवाजा उघडला व आम्हांला सांगितले की, घरामध्ये दोन चोर आले होते त्यांनी माझ्या हातातील व गळ्यातील सोने चोरण्याचा प्रयत्न करीत असताना मी त्या चोरासोबत झटापट केली. तेव्हा चोरांनी डाव्या पायाच्या मांडीवर चाकूने मारुन जखमी करून अंगावरील सोने घेऊन गेले असल्याचे सांगितले. घराचे चॅनेल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. एक सोन्याची हातातील पाटली 15 ग्राम वजनाची, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण किंमत 52 हजार रुपये किमतीचे दागिने चोरले.

त्याचप्रमाणे गावातील रामभाऊ बाजीराव सूर्यवंशी यांच्याही घरात चोरट्यांनी चोरी केली त्यांच्या घरातील नवग्रहचे सोन्याचे दागिने (23 हजार रुपये) चोरून नेले असा दोन्ही घरातील मिळून 29 ग्राम सोने किंमत 75 हजार 400 असा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला.