चुकून घोटाळा झाला, अधिष्ठात्यांकडून भलताच ईमेल पाठवला गेला

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनामधल्या एका प्रसिद्ध विद्यापीठाच्या अधिष्ठात्याने जाम मोठा घोळ घातला आहे. विल्यम हब्बार्ड असं या अधिष्ठात्याचे नाव आहे. साऊथ कॅरोलिनातील कायद्याच्या विद्यापीठाचे ते अधिष्ठाता असून त्यांनी घडल्याप्रकाराबद्दल माफी मागितली आहे. ” घडलेला प्रकार अपघाताने घडला असून मला या प्रकाराबद्दल खेद वाटतो आहे” असे हब्बार्ड यांनी सांगितले.

नेमके काय घडले?
विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांचा निकाल लागला आहे, निकाल पाहून हब्बार्ड खूश झाले होते, कारण 82 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यांनी निकालाचा हा ईमेल अजाणतेपणी पाठवला. ईमेलसोबत असलेली अटॅचमेंट काय आहे हे त्यांनी पाहिलेच नव्हते. या अटॅचमेंटमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांना मिळालेले मार्क होते. नापास विद्यार्थ्यांची माहिती सार्वजनिक करणं हे अयोग्य आणि बेकायदेशीर आहे. हब्बार्ड यांनी ही माहिती ईमेलद्वारे पाठवून सार्वजनिक केली आहे. ही माहिती सार्वजनिक झाल्याने त्यांना माफी मागावी लागली आहे. आपण नाराज झालेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी तयार असून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून आपली बाजू मांडण्यास तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. हब्बार्ड यांनी त्यांची दिलगिरी ईमेलद्वारे व्यक्त केली असून जे विद्यार्थी प्रत्यक्ष भेटू इच्छितात त्यांच्यासाठी आपण वेळ देऊ असे त्यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या