
पश्चिम रेल्वेने लोकलच्या डब्यांमध्ये इन्फोटेन्मेंट बेस्ड एलसीडी स्क्रीन बसविण्याचे कंत्राट दिले आहे. पाच वर्षांसाठी दिलेल्या या कंत्राटाद्वारे पश्चिम रेल्वेला नॉन फेअर रेव्हेन्यू अंतर्गत रेल्वेला 3.45 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. सध्या 8 लोकलमध्ये हे माहिती प्रसारित करणारे एलसीडी बसविण्यात आले असून एकूण 20 लोकलमध्ये हे एलसीडी लावण्यात येणार आहेत.
लोकलमध्ये प्रथमच 24 इंचाचे एलसीडी स्क्रिन बसविण्यात येणार आहेत. या एलसीडी स्क्रिनवर रेल्वेसंबंधित आणि लोक जनजागृती संबंधित वृत्त आणि कमर्शियल जाहिराती 70-30 या प्रमाणात दाखविण्यात येणार आहेत. या एलसीडी स्क्रिनला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.































































