आता माझी वेळ आलीय, हेलिकॉप्टर पाठवा आणि वचन पूर्ण करा; भाजप खासदाराला खडे बोल सुनावणारी गर्भवती महिला पुन्हा चर्चेत

भाजपचे सरकार असलेल्या मध्य प्रदेशात रस्त्याची मागणी करणाऱ्या महिलेचा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सीधी जिल्ह्यात रस्ता बनवण्यासाठी सोशल मीडियावर लीला साहू या महिलेने व्हीडियोच्या माध्यमातून सरकारला आवाहन केले होते. यावेळी भाजप खासदार राजेश मिश्रा यांनी या महिलेला डिलिव्हरीची तारीख सांगा, उचलून रुग्णालयात दाखल करू आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे, असा सल्ला दिला होता. यामुळे तिने पुन्हा एकदा व्हिडीओच्या माध्यमातून राजेश मिश्रा यांना त्यांचे वचन पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

डिलिव्हरीची तारीख सांगा, उचलून रुग्णालयात दाखल करू; रस्त्याची मागणी करणाऱ्या महिलेला भाजपा खासदाराचा अजब सल्ला

इन्फ्लुएंसर लीला साहूने एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने खासदार राजेश मिश्रा यांना त्यांचे वचन पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. “आता गरज आहे… तुम्ही तुमचे वचन पूर्ण केले पाहिजे… तो दिवस आला आहे. तुम्ही अभिमानाने म्हणत होता की आम्ही लीला साहूला उचलून घेऊ… म्हणजे आम्ही तिला प्रसूतीसाठी घेऊन जाऊ. आता मला प्रसुती वेदना होत आहेत… मी तुम्हाला आवाहन करत आहे की खासदारजी, कृपया आत्ताच हेलिकॉप्टर पाठवा… कारण आता मला वेदना चालू झाल्या आहेत… आणि या वेदना प्रसूतीपूर्वीच्या आहेत, असे ती व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.

लीला साहू गेल्या एक वर्षापासून तिच्या गावात रस्त्यासाठी मोहीम राबवत आहेत. परंतु आतापर्यंत प्रशासनाने हा रस्ता बांधलेला नाही. दरम्यान, तेथील स्थानिक काँग्रेस आमदार अजय सिंह यांनी स्वखर्चाने रस्त्याचे तात्पुरते बांधकाम सुरू केले आहे.

यूट्यूबर लीलाच्या संघर्षानंतर गावात रस्त्याचे काम सुरू