ज्येष्ठ अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं वयाच्या 93 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रमेश देव यांचे पुत्र अभिनेता अजिंक्य देव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव यांनी चार दिवसांपूर्वीच आपला 93 वा वाढदिवस साजरा केला होता.

रमेश देव यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1950 मध्ये मराठी चित्रपटापासून केली. पुढे त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले. त्यांनी सुरुवातीला छोटे छोटे पात्र पडद्यावर साकारले. पुढे रमेश देव यांना चित्रपटात मुख्य भूमिका मिळत गेल्या. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात मुख्य भूमिका केल्या. तर हिंदी चित्रपटांत त्यांनी सहकलाकारांची भूमिका केलेली आहे. त्यांनी आतापर्यंत 280 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

रमेश देव यांनी 1962 मध्ये अभिनेत्री सीमा देव यांच्यासोबत लग्न केलं. त्यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केलं. रमेश देव हे त्यांची पत्नी सीमा देव यांच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठे होते.