शेतात शिरलेल्या बिबटय़ाला वनविभागाने केले जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांजा तालुक्यातील खावडकरवाडीतील शेतात बिबटय़ा शिरताच परिसरात घबराट निर्माण झाली. वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चिखलात माखून पिसाळलेल्या बिबटय़ाला पकडणे अतिशय जिकीरीचे काम होते. वनविभागाच्या पथकाने साहस दाखवत या बिबटय़ाला अत्यंत शिताफीने जेरबंद केले.

लांजा तालुक्यातील खावडकरवाडी येथील चंद्रकांत नारायण गुरव यांच्या भातशेतीच्या कुंपणाला लावलेल्या फासकीमध्ये बिबटय़ा अडकला होता. वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पिंजऱ याच्या सहाय्याने बिबटय़ाला सुखरुप पकडले. त्यानंतर बिबटय़ाची पशूवैद्यकिय अधिकाऱ यांकडून तपासणी करुन घेऊन त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. हा बिबटय़ा नर जातीचा असून अंदाजे पाच वर्षे वयाचा होता. ही कारवाई र.शि.भवर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी परिक्षेत्र वनअधिकारी प्रियंका लगड, लांजाचे वनपाल सागर पाताडे, संगमेश्वरचे वनपाल सु.आ.उपरे, वनरक्षक न्हानू गावडे, राहूल गुंठे, मिलींद डाफळे, वनमजूर खेडेकर यांनी पार पाडली.