बिबट्याने घेतला शेतकऱ्याचा बळी, बिनमुंडक्याचे धड सापडले

18

बद्रीनाथ खंडागळे । पैठण

आनंदपूर शिवारातील 56 वर्षीय आनंद ठेणगे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गुरुवार सकाळपासून ते बेपत्ता होते. चपला, रक्ताळलेली जमीन व फरफटत नेल्याच्या खुणा आढळून आल्यानंतर तपास करण्यात आला असता रात्री ऊशीरा त्यांचा छिन्नविच्छिन्न मृतदेह जंगलात सापडला. पैठण परिसरात 4 महिन्यांपासून वारंवार दर्शन देणाऱ्या बिबट्याने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यामुळे वनाधिकाऱ्यांविरूध्द संताप व्यक्त केला जात आहे.

गुरुवारी सकाळी आनंद मुरलीधर ठेणगे हे घरुन निघाले आणि त्यानंतर बेपत्ता झाले. दुपारी आनंदपूर शिवारात त्यांच्या चपला आढळून आल्या. तेथून पुढे रक्ताळलेला भूभाग व फरफटत नेल्याच्या खुणा दिसून आल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले. संध्याकाळी सर्व गाव एकत्र आले. पैठण पोलिसांना कळवण्यात आले. वनविभागाचे गोविंद वैद्य त्यांच्या पथकासह दाखल झाले. अखेर रात्री 9 वाजता या शेतकऱ्यांचे छिन्नविच्छिन्न शव दाट झाडीत आढळून आले. प्रेताचे केवळ धड या जागी होते. शिर मात्र या हिंस्र श्वापदाने खाल्ले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या