
मुंबई ते पूणे या दोन महानगरांना जोडणार्या डेक्कन क्वीनला येत्या 22 जूनपासून एलएचबी तंत्रज्ञानाचे आधुनिक डब्बे जोडण्यात येणार आहेत. रेल्वेच्या या पहिल्या सुपरफास्ट गाडीचे वैशिष्ट्य असलेली ‘डायनिंग कार’(चाकावरचे उपहारगृह)लाही एलएचबीचे स्वरूप देण्यात आल्याने ही गाडी नव्या साजात प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे. नव्या गाडीला एक डबा कमी असला तरी या डब्यांची लांबी पारंपारिक डब्यांच्या तुलनेत जास्त असल्याने प्रवासी बसण्याची क्षमता मात्र प्रत्येक डब्यांच्या मागे 8 ते 10 प्रवाशांनी वाढणार आहे.
‘डेक्कन क्वीन’ ला निळ्या व पांढर्या रंगाऐवजी नवीन रंगसंगती देण्यात आली आहे. या गाडीचे डब्बे एलएचबी तंत्रज्ञानाचे कल्यानंतर तिचे वैशिष्ठ्ये असलेली ‘डायनिंग कार’ एलएचबी स्वरूपात तयार करण्याचे शिवधनुष्य चेन्नईच्या आयसीएफ कारखान्याने सहज पेलले. त्यामुळे आता 22 जून पासून एलएचबी डब्यांच्या साथीने धावणार्या ‘डेक्कन क्वीन’ला 17 ऐवजी 16 डबे जोडले जाणार आहेत. नव्या रचनेत एक डबा जरी कमी झाला असला तरी गाडीची प्रवासी क्षमता मात्र वाढणार आहे. नव्या स्लिपर कोचमध्ये आठ प्रवासी जादा तर थर्ड एसी डब्यांत दहा प्रवासी जादा बसू शकणार आहेत. या गाडीला नवीन एलएचबी डायनिंग कारही जोडण्यात येणार आहे. मुंबई ते पुणे प्रवासातील निसर्ग सौदर्याचा आनंद लुटता यावा यासाठी पारदर्शक छताच्या ‘विस्टाडोम’ कोचला जोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ठ केले आहे.
नवे एलएचबी डबे जर्मन तंत्रज्ञानाचे असून ते लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टील पासून बनलेले असतात. अपघात प्रसंगी ते कमी धोकादायक असतात. हे डबे पारंपारिक डब्यांपेक्षा 1.7 मीटरने लांब असल्याने त्यात जादा प्रवाशांना बसतात येते. पारंपारिक डब्यांना दर 18 महिन्यातून एकदा तर नव्या एलएचबी डब्यांंची दोन वर्षांतून एकदा देखभालीसाठी कारखान्यात रवानगी करावी लागते.
पारंपारिक आयसीएफ डबे एलएचबी डबे
स्लिपर कोचचे – 72 प्रवासी स्लीपर कोच – 80 प्रवासी
थर्ड एसी – 64 प्रवासी थर्ड एसी – 74 प्रवासी


























































