
हमालांमध्ये भांडण लावण्यासह शिवीगाळ केल्याच्या वादातून कामगाराचा खून करणाऱया हमालाला सातारा येथील पहिले जिल्हा-सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठाविली आहे.
सोमनाथ कारभारी गोलार असे मृताचे नाव असून, संतोष रावसाहेब सातपुते (रा. नायगाव, ता. पाटोदा, जि. बीड) याला शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.
सोमनाथ गोलार आणि संतोष शिंदे हे दोघे चिमणगाव येथे जरंडेश्वर कारखान्यावर हमाल म्हणून काम करीत होते. कारखान्याच्या परिसरातच हमालांची चाळ आहे. यातील सोमनाथ गोलार हा शिवीगाळ करतो व आपल्याबद्दल कामगारांमध्ये चुगल्या करीत असल्याच्या कारणावरून 31 डिसेंबर 2015 रोजी दोघांचे भांडण झाले. त्यावेळी ‘तुला आज रात्री दाखवतोच!’ अशी धमकी आरोपीने दिली होती. त्या रात्री संतोष हा सोमनाथच्या खोलीवर आला व त्याने त्याच्याबरोबर भांडायला सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्याने संतोषने कोयत्याने वार करून सोमनाथचा खून केला होता. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक डी. जी. बागवे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अॅड. ओक यांनी काम पाहिले. खटल्यात आलेला पुरावा, वैद्यकीय आधिकारी
























































