माझे आयुष्य हा माझा मोठा गुरू – मधुर भांडारकर

727

माझे आयुष्य हा माझा सर्वात मोठा गुरू आहे आणि मला माझ्या आयुष्याकडून सर्कोत्कृष्ट मिळाले असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक, पटकथाकार आणि निर्माता मधुर भांडारकर यांनी केले. व्हिसलिंग वूडस् इंटरनॅशनलच्या सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप मधुर भांडारकर यांच्या मुलाखतीने झाला. त्यावेळी ते बोलत होते. फिल्म इंडस्ट्रीतील  प्रवासाबद्दल सुभाष घई यांच्याशी संवाद साधताना मधुर भांडारकर म्हणाले, ‘मी व्हिडीओ-कॅसेट लायब्ररीमध्ये जवळपासच्या भागात कॅसेट पोचविणे आणि आणणे हे काम करीत असे आणि त्यात सुभाष घई यांच्या घरीही जात असे. येथे माझा प्रवास सुरू झाला. चित्रीकरण बघणे आणि त्याचे विश्लेषण करणे यासाठी मी चित्रपटांच्या सेटला भेट देत असे.

आपली प्रतिक्रिया द्या