दहशतवादी अरिझ खानला फाशीऐवजी जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाटला हाऊस चकमक प्रकरणातील दहशतवादी आरिझ खान याची मृत्युदंडाची शिक्षा बदलून दिल्ली हायकोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 31 बळी घेणाऱ्या दिल्लीतील साखळी बॉम्बस्फोटटातील दहशतवादी बाटला हाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी बाटला हाऊस इमारतीला वेढा घातला होता. या वेळी झालेल्या चकमकीत पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा शहीद झाले होते, तर पोलीस कर्मचारी बलवंतसिंह राजवीर जखमी झाले होते. तेव्हा आरिझ खान तिथून पळून गेला होता. पोलिसांनी त्याला 2018मध्ये नेपाळमधून अटक केली होती. सत्र न्यायालयाने त्याला 15 मार्च 2021 रोजी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी घेऊन 18 ऑगस्ट 2023 रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. आता हायकोर्टाने ही शिक्षा बदलून आरिझ खानला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.