‘कच्चा कांदा’ खाण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कच्च्या कांद्याचे सेवन करणे अनेकांना आवडते. कांदा योग्य प्रमाणात खाल्ला तर अनेक आजारांपासून दूर राहू शकता तसेच रक्तदाब नियंत्रित राहायलाही मदत होऊ शकते,  ह्रदय आणि फुफ्फुस निरोगी राहतात, पण जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त कच्चा कांदा खाल्ला तर आरोग्याला फायदा होण्याऐवजी त्रास सहन करावा लागू शकतो. एवढेच नाही तर कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, पोटाच्या अनेक समस्याही आपल्याला सतावू शकतात. जाणून घेऊया कांदा खाण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

शस्त्रक्रिया
तुमच्यावर एखादी शस्त्रक्रिया झाली असेल तर कांद्याचे सेवन केल्याने रक्त गोठण्याची समस्या उद्भवू शकते. एवढेच नाही तर कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होऊ शकते, त्यामुळे शस्त्रक्रियेच्या एक आठवडा आधी आणि नंतर कांदा खाऊ नका.

मधुमेह
रक्तातील साखर कमी झाली असेल तर ठराविक प्रमाणापेक्षा जास्त कांदा खाऊ नका. यामुळे रक्तातील साखर आणखी कमी होऊ शकते. मधुमेह असणाऱ्यांना कच्चा कांदा खायला आवडत असेल तर त्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण वेळच्या वेळी तापासणे आवश्यक आहे.

पचनविकार
पचनविकाराशी निगडित समस्या असतील तर कच्चा कांदा अति जास्त प्रमाणात खाऊ नका. यामुळे पचनाशी निगडीत समस्येत वाढ होऊ शकते.

गर्भधारणा आणि स्तनपान
गरोदर किंवा स्तन्पान करणाऱ्या महिलांनी गरजेपेक्षा जास्त कांदा खाणे टाळावे. यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.