निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत करा ‘या’ चहाचा समावेश, होतील अनेक आरोग्यदायी फायदे

स्वयंपाकघरात मसाल्याच्या पदार्थांमध्ये जिरे हमखास सापडते. बऱ्याचशा पदार्थांत चिऱ्याचा वापर केला जातो. यामुळे चव वाढतेच शिवाय अन्नाला सुगंधही येतो. जिरे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. अ‍ॅण्टी-ऑक्सिडंट्ससोबतच दाहकविरोधी गुणधर्मांनी युक्त असलेले जिरे पोटासाठी खूप चांगले आहे. पोट फुगण्याची किंवा जडपणाची समस्या असल्यास जिऱ्याचा चहा पिणे चांगले मानले जाते. जिऱ्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. या चहामुळे ऊर्जा वाढते. इतकंच नाही, तर चयापचय वाढवण्यासोबतच या चहामुळे वजनही कमी होते. शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यासाठी जिऱ्याचा चहा पिणे गुणकारी ठरते. यामुळे वजन कमी होतेच शिवाय पचनक्रियाही सुरळीत राहते. जाणून घेऊया जिऱ्याचा चहा पिण्याचे फायदे.

जिरे चहा तयार करण्याच्या विविध पद्धती

जिरे-मध चहा
– एका भांड्यात काही वेळ जिरे भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित उकळवून घ्या. हे पाणी आता गाळून घ्या. यामध्ये थोडे मध टाका. या चहामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

लिंबू-जिरे चहा
– लिंबासह जिरे पाण्यात व्यवस्थित उकळवा. नंतर त्यात लिंबाचे काही थेंब टाका. यामुळे चयापचय वेगाने वाढेल आणि अतिरिक्त चरबी शरीरात जमा होऊ शकणार नाही.

मेथी दाणे जिरे चहा
जिरे आणि मेथी एकत्र पाण्यात उकळा. नंतर ते गाळून प्या. यामुळे शरीरात होणार्‍या हार्मोनल समस्या दूर होतील. ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होऊ शकते. जिरे चहा प्यायल्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक फायदे होतात. हा चहा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, मेंदू, हृदय, अशक्तपणा, अशक्तपणा, यकृत या समस्यांवर गुणकारी आहे. निरोगी राहण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत जिऱ्याच्या चहाचा समावेश करू शकता.