चेहऱ्यावरील अनावश्यक केस सौंदर्यात ठरतात बाधा? ‘हे’ करा घरगुती उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेहऱ्यावरील अनावश्यक केस सौंदर्यात बाधा ठरतात.कधी हे केस हनुवटीवर वाढतात तर कधी गालावर, कधी ओठांवर आणि कानाच्या बाजूलाही वाढतात. मग अशावेळी एकतर पार्लरमध्ये जाऊन व्हॅक्सिंग, थ्रेडींग किंवा ब्लिचसारख्या ट्रीटमेंट घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र काही घरगुती उपचाराने या समस्येवर उपाय करता येतो. घरच्या घरी या सोप्या गोष्टी केल्याने नक्कीच फरक पडेल.

दूध आणि हळद

एका भांड्यात तांदळाचे पीठ, हळद आणि दूध एकत्र करा. हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर काहीवेळ चेहरा सुकवा. चेहरा सुकल्यानंतर तो कोमट पाण्याने स्वच्छ करा.हा उपाय दररोज केल्याने लवकरच फरक दिसू लागेल.

लिंबू आणि साखर

लिंबाचा रस, साखर आणि मध एकत्र करून पेस्ट बनवा. ज्याठिकाणी अनावश्यक केस वाढतात तिथे ही पेस्ट लावा. त्यानंतर त्यावर काप मग तुम्ही त्या जागेवर कापडी पट्टी लावा आणि विरुद्ध दिशेने ओढा. असे केल्याने केस निघून चेहरा स्वच्छ होईल. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्याने लवकर परिणाम दिसून येईल.

हळद आणि कोरफड

हळद आणि कोरफड चेहऱ्यासाठी गुणकारी मानले जाते. या दोन्ही गोष्टी चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांपासून मुक्त होण्यास मदत करतील. यासाठी कोरफड जेलमध्ये एक चमचा हळद पूड चांगली मिसळावी. नंतर हे मिश्रण केसाळ भागावर लावा. कोरडे झाल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांची वाढ कमी होईल.

ओट्स आणि केळी

या दोन्हीच्या मदतीने नको असलेल्या केसांपासूनही सुटका मिळवू शकता. फक्त ओट्स पाण्यात भिजवून मऊ करायचे त्यानंतर त्यात केळी मॅश करायची आणि त्याची पेस्ट तयार करायची. आता पेस्टने चेहऱ्याला मसाज करायचा. काहीवेळीने पाण्याने स्वच्छ चेहरा धुवा. हे उपाय 2 ते 3 दिवसातून एकदा केल्यास त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील.