फुटबॉलमध्ये शून्य असलेल्या हिंदुस्थानात मेस्सी लाखमोलाचा

अर्जेंटिनाचा जगज्जेता कर्णधार लिओनल मेस्सी हिंदुस्थानात पाऊल ठेवतोय. त्याच्या भेटीने फुटबॉल शून्य हिंदुस्थानात फुटबॉलची व्रेझ आणि प्रगती किती होणार याची कल्पना नाही. मात्र या महान फुटबॉल हिरोला भेटण्यासाठी हिंदुस्थानी चाहत्यांना खिशातून दहा लाख रुपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘गोट टूर’अंतर्गत भेटीगाठीच्या पॅकेजची किंमत अक्षरशः दहा लाख रुपये प्रति व्यक्ती ठेवण्यात आली आहे. फक्त एक हात मिळवण्यासाठी, सहा जणांसोबत एक फोटो आणि प्रीमियम लाऊंजमधील खानपानासाठी असेल.

कुठे काय होणार?

  • कोलकाता ः फॅन्स व मीडिया कार्यक्रम
  • हैदराबाद ः 7 बाय 7 प्रदर्शनीय सामना. यात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सहभागी
  • मुंबई ः चॅरिटी फॅशन शो, मेस्सीची विश्वचषक जर्सी व स्मृतिचिन्हांचा लिलाव
  • दिल्ली ः पंतप्रधान मोदींसोबत भेट आणि समारोप सोहळा.