#INDvWI विंडीजचा 8 विकेट्सने दणदणीत विजय, मालिकेत 1-1 बरोबरी

1460

तिरुवअनंतपुरममध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 लढतीत पाहुण्या वेस्ट इंडीजने यजमान टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेले आव्हान विंडीजने 19 व्या षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. वेस्ट इंडीजकडून सिमन्सने नाबाद 67 धावांची मॅचविनिंग खेळी केली.

सिमन्ससह ल्युईसने 40, पूरनने नाबाद 38 आणि हेटमायरने 23 धावांचे योगदान दिले. या विजयासह वेस्ट इंडीजने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली असून निर्णायक सामना 11 डिसेंबरला, मुंबईतील वानखेडे मैदानात होईल.

तत्पूर्वी टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 170 धावा केल्या आणि वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 171 धावांचे आव्हान ठेवले. टीम इंडियाकडून शिवम दुबे याने सर्वाधिक 54 धावा केल्या, तर ऋषभ पंतने नाबाद 33 धावांचे योगदान दिले.

ind v wi t20 match live score –

 • विजयासाठी 18 चेंडूत 17 धावांची आवश्यकता
 • विंडीजच्या 150 धावा पूर्ण
 • 17 षटकानंतर विडीजच्या 2 बाद 152 धावा
 • 16 षटकानंतर विडीजच्या 2 बाद 142 धावा
 • सिमन्सचे 38 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटाकारांसह अर्धशतक
 • विजयासाठी 36 चेंडूत 59 धावांची आवश्यकता
 • 14 षटकानंतर विडीजच्या 2 बाद 113 धावा
 • हेटमायर 23 धावांवर बाद
 • विंडीजला दुसरा धक्का, विराटचा अफलातून कॅच

 • विंडीजच्या 100 धावा पूर्ण
 • 12 षटकानंतर विडीजच्या 1 बाद 91 धावा
 • 10 षटकानंतर विडीजच्या 1 बाद 73 धावा
 • सुंदरने 40 धावांवर केले यष्टीचित
 • विंडीजला पहिला धक्का, ल्युईस बाद
 • 8 षटकानंतर बिनबाद 59 धावा
 • 7 षटकानंतर बिनबाद 51 धावा
 • विंडीजच्या 50 धावा पूर्ण
 • 6 षटकानंतर बिनबाद 40 धावा
 • विंडीजची दमदार सुरुवात, पॉवरप्लेमध्ये एकही विकेट गमावली नाही
 • पाच षटकानंतर विंडीजच्या बिनबाद 26 धावा
 • वाशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंतने सोडला झेल
 • एकाच षटकात दोनदा विकेट्ची संधी
 • विंडीजची फलंदाजी सुरू
 • 20 षटकात टीम इंडियाच्या 7 बाद 170 धावा

 • टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
 • बाद होण्यापूर्वी केल्या 10 धावा
 • टीम इंडियाचा निम्मा संघ माघारी, श्रेयस अय्यर बाद
 • 16 षटकानंतर 4 बाद 144 धावा
 • 15 षटकानंतर 4 बाद 132 धावा
 • आघाडीचे फलंदाज बाद झाल्याने धावगतीला ब्रेक
 • 14 षटकानंतर 4 बाद 128 धावा
 • बाद होण्यापूर्वी केल्या 19 धावा
 • टीम इंडियाला चौथा धक्का, विराट बाद

 • 12 षटकानंतर 3 बाद 112 धावा
 • 11 षटकानंतर 3 बाद 104 धावा
 • टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
 • बाद होण्यापूर्वी केल्या 54 धावा
 • हिंदुस्थानला तिसरा धक्का, अर्धशतकानंतर दुबे बाद
 • 27 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतकाला गवसणी
 • शिवम दुबेचे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील पहिले अर्धशतक

 • 9 षटकानंतर टीम इंडियाच्या 2 बाद 84 धावा
 • पोलार्डच्या एकाच षटकात 3 षटकार
 • शिवम दुबे ‘ऑन फायर’, विंडीजविरुद्ध षटकारांची आतिषबाजी
 • रोहित शर्मा 15 धावांवर बाद
 • हिंदुस्थानला दुसरा धक्का, दोन्ही सलामीवीर माघारी
 • 7 षटकानंतर 1 बाद 45 धावा
 • 6 षटकानंतर 1 बाद 42 धावा
 • 5 षटकानंतर 1 बाद 37 धावा
 • 4 षटकानंतर 1 बाद 28 धावा
 • पिअरने 11 धावांवर केले बाद
 • हिंदुस्थानला पहिला धक्का, राहुल झटपट बाद

 • 3 षटकानंतर बिनबाद 24 धावा
 • 2 षटकानंतर बिनबाद 19 धावा
 • 1 षटकानंतर बिनबाद 12 धावा
 • के.एल. राहुल आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात
 • हिंदुस्थानचा संघ –

 • वेस्ट इंडीजचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • थोड्याच वेळात नाणेफेक होणार

आपली प्रतिक्रिया द्या