650 कोटींचे राफेल 1600 कोटींवर कसे गेले; शरद पवार यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । बीड

राफेल विमान खरेदीच्या मुद्द्यावरून आरोप- प्रत्यारोप होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनीही आपल्या भाषणात हा मुद्द्या उपस्थित केला. राफेल खरेदी व्यवहाराची माहिती गुप्त का ठेवण्यात आली आहे, असा सवाल त्यांनी सरकारला केला. 650 कोटींचे राफेल 1600 कोटींवर कसे गेले याबाबत सरकारने माहिती द्यावी.सरकार जर या प्रकरणी स्पष्टीकरण देणारच नसेल तर आरोप होणारच. त्यामुळेच राफेल विमान खरेदीची माहिती संसदेत देण्यात यावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे. सरकारने याबाबतची योग्य माहिती देऊन जनतेतील संभ्रम दूर करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

  • केंद्राने 650 कोटीचे 1600 कोटी कसे केले तपास झाला पाहिजे
  • मी मोदीचे समर्थन केले नाही
  • ज्या विमानाची किंमत 650 कोटी होती त्याची किंमत 1600 कोटी पर्यंत केली
  • राफेलची चर्चा सगळीकडे सुरू आहे
  • सर्वपक्षीय चौकशी करा, कागदपत्रे द्या
  • राफेलच्या माध्यमातून देशाची लूट झाली आहे
  • बोफर्सची चौकशी करा म्हणणारे भाजप राफेल बाबत गप्प आहे
  • तांत्रिक माहिती देऊ नका, किंमतीची माहिती का देत नाहीत मोदी
  • मोदी ना सत्तेवरून खाली खेचल्या शिवाय पाकिस्तानला धडा शिकवता येणार नाही
  • म्हणून पाकिस्तानची मजल वाढली
  • 56 इंचाचा छातीला काही करता आले नाही
  • चार वर्षांत शेकडो सैनिक मृत्युमुखी पडले, मोदींनी काय केले?
  • सरकारला शेतकऱ्याचं दुखणे दिसेना
  • धनदांडग्यांनी बँकांचे कर्ज थकवले, पण मोदींनी उद्योग आणि श्रीमंतांची कर्जे माफ केली
    पण शेतकऱ्याचे दुःख त्यांना समजत नाही
  • मोदी, फडणवीस यांच्याकडे असलेल्या सत्तेचा वापर जनतेसाठी नाही
  • ज्यांच्या हातात राज्याची आणि केंद्रात सत्ता आहे त्यांना हटवायचे आहे
  • त्यामुळे असे सरकार खाली आणणं हेच आमचे लक्ष्य आहे
  • या दरवाढीचा परिणाम तुमच्या खिशावर होतो आहे
  • पेट्रोल डिझेलचे पैसे आधी वाढले नव्हते असं म्हणणार नाही, पण आता दरवाढीचा विक्रम मोडला आहे
  • महागाईमुळे कंबरडं मोडलं
  • आमच्या कार्यकाळात एका आठवड्यात आम्ही 71 हजार कोटींची कर्ज माफ केले, अन् शेतकरी कर्जमुक्त झाला होता
  • अशा अवस्थेत बँकेचा पैसा कसा फेडायचा, जप्तीमुळे अपमान होईल त्या पेक्षा मेलेले बरे ही शेतकऱ्याची मानसिकता
  • शेतकऱ्यांची शिवारं कोरडी पडली, शरद पवार यांचं टीकास्र
  • पाऊस नाही पिके उद्ध्वस्त
  • कर्जबाजारीपणा हे आत्महत्येचे कारण आहे
  • या आत्महत्त्या ग्रस्त जिल्ह्यात बीड जिल्हा हा अग्रेसर, इथे दुष्काळाचे संकट
  • शेतकरी हा देशाचा कणा आहे, त्या शेतकरी कुटूंबाला आत्महत्त्या करावी लागत आहे