Live : माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना अटक, सीबीआयच्या पथकाकडून कारवाई

2791

आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्याविरोधात सर्वोच्च न्याययालयात धाव घेणाऱ्या चिदंबरम यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला असून सरन्यायाधीशांकडे प्रकरण सोपवण्यात आले आहे.

वाचा आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरण आणि चिदंबरम यांच्यासंदर्भातील Live Updates : 

 • चिदंबरम यांना उद्या सीबीआयच्या विशेष कोर्टात हजर करणार

 • सीबीआय मुख्यालयात चिदंबरम यांची चौकशी
 • भाजपच्या सांगण्यावरून कारवाई, कार्ति चिदंबरम यांचा आरोप

 • तपासाणीनंतर रुग्णालयातून चिदंबरम यांना सीबीआयच्या मुख्यालयात नेण्यात आले
 • चिदंबरम यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेले
 • सीबीआयच्या पथकाने चिदंबरम यांना आपल्यासोबत नेले

 • दोन तासांच्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर चिदंबरम यांना अटक
 • सीबीआयच्या पथकाने चिदंबरम यांना घरातून केली अटक
 • पी. चिदंबरम अखेर सीबीआयच्या अटकेत

 • संवैधानिक संस्थांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप
 • कार्ति चिदंबरम यांचा सरकारवर गंभीर आरोप

 • घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, प्रचंड घोषणाबाजी
 • दिल्ली पोलिसांचे पथक चिदंबरम यांच्या घरी दाखल
 • सीबीआयनंतर ईडीचे पथकही चिदंबरम यांच्या घरी दाखल
 • सीबीआय पथकाने दिल्ली पोलिसांची मदत मागितली
 • गेटवरून उड्या मारून सीबीआयचे पथक घरात दाखल
 • चिदंबरम यांच्या जोरबाग येथील घरी सीबीआयचे पथक दाखल

 • चिदंबरम यांनी सीबीआयच्या पथकाला दिला गुंगारा
 • सीबीआय पथक काँग्रेस कार्यालयात पोहोचले
 • चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
 • तपास यंत्रणांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे – चिदंबरम

 • 27 तासांपासून वकिलांसोबत लढण्याची पूर्वतयारी करत होतो – चिदंबरम
 • कुटुंबातील कोणीही गुन्हा केलेला नाही – चिदंबरम
 • मी कोणताही गुन्हा केलेला नाही – चिदंबरम
 • पत्रकार परिषद घेणार
 • 27 तासानंतर चिदंबरम काँग्रेस कार्यालयात हजर
 • पी. चिदंबरम यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी
 • काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी सरकारवर टीका
 • चिदंबरम यांना लवकरच अटक होण्याची शक्यता
 • चिदंबरम यांच्या घराबाहेर ईडी आणि सीबीआयचे अधिकारी उपस्थित
 • हाय कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास SCचा नकार
 • चिदंबरम यांना दिलासा नाहीच
 • आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे साऱ्या देशाचे लक्ष
आपली प्रतिक्रिया द्या