Live Update – मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8 वर, एकाचा मृत्यू, एक गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • राज्यातील कोरोना बधितांची संख्या 42 वर पोहोचली
  • पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी ही माहिती दिली
  • कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एकाची प्रकृती चिंताजनक
  • मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8 वर, एकाच मृत्यू
  • घरूनच काम करण्याच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
  • जनतेला कोरोनाच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य समजले असून जनता सहकार्य करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त
  • जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच ठेवणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
  • लोकल, बस आणि मेट्रोतील गर्दी ओसरली नाही, तर सरकारला कठोर पावले उचलावी लागतील
  • जनतेच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • लोकल, बस, मेट्रो सेवा बंद केल्यास काही लोकांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण होईल
  • गर्दी कमी करण्यासाठी जनतेनेच काळजी घ्यावी
  • सरकारी कार्यालयांना सुट्टी दिलेली नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट
  • खासगी कार्यालयातील कर्मचारी 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची गरज
  • विलिगीकरण केलेल्या रुग्णांनी अधिक जबाबदारीने वागण्याचे मुख्यमंत्र्याचे आवाहन
  • कोरोनाच प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
  • सर्वधर्मियांनी पुढाकार घेत प्रार्थनास्थळी गर्दी टाळावी
  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी 15 दिवस महत्त्वाचे, जनतेने जबाबदारीने वागावे.
  • कठोर पावले उचलण्याची सरकारची इच्छा नाही, मात्र, जनतेने स्वंयशिस्त पाळावी.
  • गर्दी टाळण्यासाठी जनतेला सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.
  • जनतेने स्वतःहून गर्दी टाळण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
  • मुंबईतील लोकलसेवा बंद करण्याचा कोणताही निर्णय नाही- मुख्यमंत्र्यांची माहिती
  • राज्यातील 40 रुग्णांपैकी एकाची प्रकृती गंभी, इतरांची प्रकृती स्थिर
  • राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोनाचा पादुर्भाव रोखण्याबाबत चर्चा करण्यात आली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. थोड्याच वेळात मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सरकारी कार्यालये बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व सरकारी आस्थापना बंद राहणार आहेत. पुढील सात दिवस सरकारी कार्यालये बंद राहतील असा निर्णय आज राज्य सरकारने घेतल आहे. यापूर्वी राज्यातील शाळा, कॉलेज, मॉल्स, जिम बंद 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले होते.