लोकलमध्ये महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यास दोन वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठ वर्षांपूर्वी कर्जत-सीएसएमटी लोकलमधून प्रवासादरम्यान एका महिलेशी गैरवर्तन करणार्या ट्रव्हल पंपनीच्या कर्मचार्याला दोषी ठरवित दंडाधिकारी न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. वैलास पहाडी असे दोषीचे नाव असून कोर्टाने त्याला दोन वर्षांच्या सक्तमजूरीसह 10,000 रुपयांचा दंडही ठोठावला. यांपैकी 8,000 रुपये पीडित महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.

ज्/ 15 फेब्रुवारी 2012 रोजी सीएसएमटी ते कर्जत लोकलमधून प्रवास करत असताना दोषी पहाडीने तिला पाठीमागून मिठी मारली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गोंधळलेल्या महिलेने त्याला पाहिले आणि या कृत्याबाबत त्याला जाब विचारला. मात्र, तो त्याचक्षणी महिलांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून लगेच शेजारच्या जनरल डब्यात शिरला. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या पीडितेने आपल्या महिला सहप्रवाशांना याबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनी कांजुरमार्गला पोहोचल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या हेल्पलाइनवर फोन करुन तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला डोंबिवली स्थानकात पकडले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पहाडीवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोर्टाच्या निरीक्षणानुसार पहाडीने केलेल्या कृत्याचा पीडित महिलेच्या मनावर मोठा परिणाम झाला, यामुळे तिने आपला आत्मविश्वास गमावला.

दरम्यान, आठ वर्षे हा खटला चालला यामध्ये कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. यामध्ये पीडित महिलेने स्वतः आणि तिच्या सहकारी प्रवाशांनी पहाडीला गैरवर्तन करताना पाहिल्याचे सिद्ध झाल्याने तो यामध्ये दोषी ठरला. त्यानंतर कोर्टाने त्याला दोन वर्षांच्या कठोर तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.