‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटात अभिनेता रमेश परदेशी, अभिनेत्री प्रीतम कागणे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार असून यात दोघांची सॉलिड केमिस्ट्री जुळून आली आहे. हा चित्रपट 8 मार्चला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातून कोरोना काळातल्या लग्नाची गोष्ट दाखवली जाणार असून बहिणीच्या लग्नासाठी भाऊ किती कष्ट घेतो, बहिणीला चांगला नवरा मिळवून देण्यासाठी तो किती धडपड करतो, हे लग्न जुळवताना त्यालाच एक मुलगी आवडते, त्यादरम्यान काय धमाल होते याचे चित्रण पाहायला मिळणार आहे. अमोल कागणे प्रस्तुत ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कांगणे, अमोल कांगणे, सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचे छायांकन केले आहे. उत्तम स्टारकास्टसह धमाल, मजेशीर आणि मनोरंजक असे कथानक या चित्रपटाची खासियत आहे.
या चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, सुनील अभ्यंकर, प्रवीण तरडे, क्षितिष दाते, अमोल कागणे, विराट मडके, प्राजक्ता गायकवाड, अश्विनी चावरे, चेतन चावडा, किरण कुमावत, सुशांत दिवेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.