तुमचे बँक अकाउंट इनअ‍ॅक्टिव्ह झाले आहे का? असं का करा सुरु…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
बँक खात्यासाठी हवा आधार क्रमांक

देशभरात मागील एक वर्षाहून अधिक काळापासून कोरोनाचे संकट असल्याने बँका आपल्या ग्राहकांना काही महत्वाचे काम असेल, तरच बँक शाखेत येण्यास सांगत आहे. अनेक बँकांनी याकाळात ऑनलाईन व्यवहार करण्याचे आव्हान केले आहे. कोरोना काळात लॉकडाउनमुळे अनेकांचे व्यवसाय डबघाईला आले आहे, तर अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. अशा परिस्थितीत व्यवहार न केल्यामुळे त्यांची बँक खाती इनअ‍ॅक्टिव्ह झाली आहेत. तुम्हीही बँक खात्यामधून व्यवहार करून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, तर तुम्हाला तुमचे बँक खाते पुन्हा रिअ‍ॅक्टिव्ह करणे आवश्यक आहे.

बँक खाते इनअ‍ॅक्टिव्ह कधी होते?

नियमांनुसार, जर तुम्ही तुमच्या बँक खात्यातून 12 महिने कोणताही व्यवहार केला नाही, तर तुमचे बँक खाते इनअ‍ॅक्टिव्ह होते. तसेच जर तुम्ही 24 महिने तुम्ही तुमचे बँक खाते कोणत्याही व्यवहारासाठी वापरले नाही. तर तुमचे बँक खाते डोर्मेंटच्या यादीमध्ये सामील होते.

असं करा रिअ‍ॅक्टिव्ह…

बँक खाते रिअ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक शाखेत जावं लागणार आहे. बँकेत आल्यानंतर तुम्हाला खाते पुन्हा सुरु करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह लिहून अर्ज बँकेला करावा लागणार आहे. यानंतर तुमचं बँक खात रिअ‍ॅक्टिव्ह करण्यात येईल. आपले बँक खाते नेहमी सुरु ठेवण्यासाठी वर्षातून एक ते दोन व्यवहार करणे आवश्यक आहे.