जिल्ह्यात येण्या-जाण्यासाठी ऑनलाईनवर एकूण 21 हजार 118 जणांची नोंद

2222

कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी 12 हजार 147 तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या 8 हजार 940 जणांनी प्रशासनाने तयार केलेल्या या लिंकवर आपली माहिती भरली.आज शनिवारी सायंकाळी 7 पर्यंत एकूण 21 हजार 118 जणांनी नोंदणी केल्याची माहिती, जिल्हाप्रशासनाकडुन देण्यात आली आहे. दरम्यान अनेक वेळा ऑनलाईनलवर माहिती भरताना,तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने, कित्येक तास नागरिकांना वेट अँड वाॅच करावे लागत होते.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात स्थलांतरित कामगार,विद्यार्थी,पर्यटक,यात्रेकरु,प्रवासी आणि इतर नागरिक अडकले आहेत.त्यांना आपापल्या जिल्ह्यांत तसेच राज्यामध्ये जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे.यानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधून बाहेर जाणाऱ्या तसेच बाहेरच्या जिल्ह्यामधून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने https://bit.ly/Kopentryexit ही लिंक तयार केली आहे.यावर माहिती भरण्याचे आवाहन काल केले होते. आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत यावर जिल्ह्यात प्रवेशासाठी 12 हजार 147 जणांनी, जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी 8 हजार 940 जणांनी तर 31 जणांनी जाणे वा येणे अशी कोणतीच माहिती न देता या लिंकवर नोंदणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या