लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध एकाच दिवसात 1037 गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
maharashtra-police2

लॉकडाऊन लागू झाल्यापासून कलम 188 चे उल्लंघन केल्या प्रकरणी कालसायंकाळ पासून ते आज दुपारपर्यंतच्या काळात 1037 नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 73 हजार 735 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यात 22 मार्चपासून लॉकडाऊनची परिस्थिती आहे. या काळात कोवीड 19 च्यासंदर्भात लागू केलेल्या सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस विभागाने कारवाई केली आहे. आजपर्यंत कोवीड 19 च्या अनुषंगाने पोलिसांच्या 100 क्रमांकावर 78 हजार 474 एवढ्या तक्रारी आल्या होत्या. क्वारंटाईनचे उल्लघंन केल्याप्रकरणी 610 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात कुठेही पोलीसांवर हल्ला झाल्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 6 महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर

गेल्या चोवीस तासात अवैध वाहतुकीची नवीन आठ प्रकरणे दाखल झाली असून आतापर्यंत त्यांची संख्या 1100 झाली आहे. नव्या आठ प्रकरणात नव्या 411 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 48 हजार 177 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर 2 कोटी 78 लाख 64 हजार 294 रुपये दंड आकारण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहेत.