अजिंक्यला आठवण ‘विठू माऊली’ची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूरला विठोबा माऊलीच्या वारीला तर लोकांना जाता आले नाही, पण गेले काही महीने लोकांनी घरातच विठूमाऊली पाहिली होती. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘विठू माऊली’ ही मराठी मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्यात विठू माऊलीची भूमिका करणार्‍या अजिंक्य राऊत याला या मालिकेच्या आठवणी सतावत आहेत. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या या मालिकेच्या शूटिंगमधल्या अखेरच्या दिवसाचा फोटो चाहत्यांशी शेयर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अजिंक्य म्हणतो, ‘हा माझा पहिलाच प्रोजेक्ट होता. यात माझ्यासाठी खुप मोठी संधी होती. या भूमिकेसाठी माझी निवड केल्याबद्दल माझ्या मनात खूप कृतज्ञता दाटून येत आहे. खास करून स्टार प्रवाह, कोठारे व्हिजन आणि संपूर्ण कास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक यांचा मी शतश: आभारी आहे. भविष्यात माझ्यासमोर काय आहे माहीत नाही, पण मला आता खूप कृतकृत्य झाल्यासारखे वाटतेय.’ असेही अजिंक्य म्हणाला. लवकरच तो आता ‘देवाक काळजी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.