लॉकडाऊनच्या काळात दारूचा साठा करणाऱ्यासह चौघांवर गुन्हे दाखल

1259

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मद्यविक्री बंद असताना खेड दस्तूर फाटा येथील आर्यन हॉटेलच्या मागील बाजूच्या झोपड्यात ‘प्या’रेलाल मंडळींनी दारूचा साठा करण्यात आला होता. हा साठा करणाऱ्या व्यक्तीसह त्याला दारू विकणाऱ्या दोन मद्य विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र बंद पाळण्यात येत असताना खेड दस्तुरी फाटा येथे एका झोपड्यात दारूचा साठा करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या झोपड्यात नऊ हजार एकशे एकोणतीस रुपयांची दारू सापडली. त्यामध्ये 6 हजार 105 रूपये किमंतीच्या किंगफिशर कंपनीच्या बिअर बाटल्या, 2100 रूपये किमंतीची 35 लीटर गावठी हातभट्टीची दारू आणि 66 रूपये किमंतीचे प्लास्टिकचे ग्लास, 858 रूपये रोख असा समावेश आहे.

खेड पोलिसांनी अनिल मधुकर जाधव रा.चिंचघर रेवेचीवाडी याला दारूच्या बाटल्यासह रंगेहाथ पकडल्यानंतर मद्यविक्री बंद असताना अनिल जाधव याला दारू विकणाऱ्या सुवर्णा वाईन्सचे मालक सुनील तोडणकर, व्यवस्थापक सुभाष पाटणे आणि हातभट्टी दारूचा पुरवठा करणाऱ्या तिसंगीतील अजित भोसले अशा तिंघाविरूद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या