मतदारांमधील जनजागृती 5 लाख मतदार वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
voter-line-maharashtra

सामना प्रतिनिधी । मुंबई

यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मोठय़ा प्रमाणावर केलेल्या जनजागृतीमुळे राज्यात मतदारांची संख्या तब्बल 5 लाखांनी वाढली आहे. 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी तसेच 1 आणि 2 मार्च रोजी सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांमधून निवडणूक आयोगाने जनजागृती केली. आता 12 निवडणूक दूतही मतदारांना मतदानाला चला म्हणून आर्जव करणार आहेत. त्यामुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीची टक्केवारी वाढणार यात शंका नाही.

सध्या महाराष्ट्रात मतदारांची संख्या 8 कोटींहून अधिक आहे. त्यात 4 कोटींहून अधिक पुरुष तर तितक्याच प्रमाणात महिलांची संख्या आहे. मुंबईत आणि ठाणे रायगडसह जवळच्या शहरांमध्ये मतदारांच्या नोंदणीची शेवटची तारीख 30 मार्च आहे. त्यामुळे मतदारांची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात सर्वाधिक मतदार ठाणे जिह्यात 23 लाख आहेत तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे.

> राज्यात 8.75 कोटी इतके मतदार आहेत.

> त्यात 4.57 कोटी पुरुष तर 4.16 कोटी महिला मतदार आहेत.

> नंदुरबार, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी आणि पालघर हे मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.

> अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

मतदारसंघ संख्या (लाखात)

ठाणे – 23
उत्तर मुंबई – 16.07
उत्तर-पश्चिम – 16.97
उत्तर-पूर्व – 15.58
उत्तर-मध्य – 16.47
दक्षिण-मध्य – 14.15
दक्षिण – 15.31