Lok sabha 2019 भाजपची नवी यादी जाहीर, आतापर्यंत 329 उमेदवारांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. सोमवारी भाजपने लोकसभा निवडणुकीची चौदावी यादी जाहीर केली आहे. या यादीत 3 उमेदवारांचा समावेश असून सर्व उमेदवार ओडिशाचे आहेत. ओडिशातील मयूरभाज लोकसभा मतदारसंघातून बिश्वेश्वर टुडू यांना तिकीट देण्यात आले आहे, तर भद्रक लोकसभा मतदारसंघातून अभिमन्यू सेठी मैदानात उतरले आहेत. तर जाजपूर लोकसभा मतदारसंघातून अमिया मलिक यांना पक्षातर्फे तिकीट देण्यात आले आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत १७ पटेल, ७० उमेदवार जाहीर

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 14 याद्या जाहीर केल्या आहेत. या 14 याद्यांमध्ये एकूण 329 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने पहिल्याच यादीमध्ये एकूण 184 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर आलेल्या याद्यांमध्ये विविध राज्यांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

भाजप तीस वर्षांत पहिल्यांदाच लढणार आडवाणींशिवाय

भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत दिल्ली, पंजाब आणि हरयाणातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. यासह उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशमधील काही जागांवरील उमेदवारांची घोषणा होण्याचे बाकी आहे. आतापर्यंत बिहार, छत्तीसगड, तमिळनाडू यासारख्या राज्यातील सर्व उमेदवारांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे.

मोठी नावं पहिल्या यादीत
भाजपने पहिल्या यादीमध्ये आपल्या प्रमुख नेत्यांचा समावेश करत उमेदवारी जाहीर केली होती. पंतप्रधान मोदी वाराणसीतून, नितीन गडकरी नागपूरमधून, मथुरामधून हेमा मालिनी, राजनाथ सिंह लखनौमधून तर धुळ्यातून सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे गांधीनगर मधून निवडणूक लढवतील.स्मृती इराणी अमेथीतून, व्ही.के.सिंह गाझियाबादमधून, साक्षी महाराज उन्नावरमधून, अर्जुन मेघवाल बिकानेरमधून, राज्यवर्धन राठोड जयपूरमधून निवडणूक लढवतील.