काँग्रेसची 16 वी यादी जाहीर, मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मुलाला उमेदवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली सोळावी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मध्य प्रदेशातील 12 उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. यातील एक नाव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मुलाचे आहे. कमलनाथ यांचा मुलगा नकूल नाथ याला छिंदवाडा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

ताज्या यादीनुसार ज्येष्ठ नेते अरुण सिंग राहुल यांना सिद्धीमधून तर अरुण यादव यांना खांडवामधून उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी गेल्या आठवड्यामध्ये काँग्रेसने मध्य प्रदेशमधील 9 उमेदवारंची यादी जाहीर केली होती. तसेच बुधवारी मध्य प्रदेश सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले थिम सॉन्ग लॉन्च केले होते. थिम सॉन्ग लॉन्चच्या वेळी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या अच्छे दिनच्या संकल्पनेवरही कडाडून हल्ला केला होता.