पक्षाचे काम तळमळीने केले तर इतिहास घडेल – आनंद जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माजलगाव

शिवसेनेत काम करणारा कार्यकर्ता पाहिजे. इथे नवा-जुना असे काही नाही. पक्षाचे काम करा एकदा भगवा खांद्यावर घातला की, पुन्हा बदलायचा नाही. नाहीतर काय हाल होतात हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे निष्ठेने काम करून प्रत्येक गावात व शहराच्या प्रत्येक वॉर्डात शाखा व शाखाप्रमुख तयार करा. मावळा लढला तर गड जिंकू. शिवसैनिक तापला तर इतिहास घडतो, म्हणून पक्षाचे काम तळमळीने करा. काम करेल तोच टिकेल, असे बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी आढावा बैठकीत सांगितले. येथील व्यंकटेश हॉल मध्ये आयोजित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत बोलत होते.

यावेळी जाधव यांच्या हस्ते नवीन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत नवले, जिल्हाप्रमुख सचिन मूळूक, जिल्हा समनव्ययक भाई संजय महाद्वार, जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब अंबुरे, सुशील पिंगळे, रामराजे सोळंके,तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव,महिला आघाडी संघटक राजश्री जाधव, शहरप्रमुख पापा सोळंके, शहर संघटक राजू शहाणे, नितीन मुंदडा, तालुका समन्वयक अशोक आळणे, प्रल्हाद सोळंके,सुनील खंडागळे, विठ्ठल जाधव, दत्ता रांजवण, युवासेनेचे बाळासाहेब मेंडके, विक्रम शिंदे, अभिजित कोंबडे, पप्पू धरपडे, नारायण चांदबोधले, सुरज गवरकर, यांचेसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.