सैन्याचा विशेषाधिकार रद्द करणार मग काय जवानांच्या हातात बेचक्या देणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav thackeray

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

काँग्रेसचा जाहीरनामा पाहिलात काय, म्हणे 124 अ क़लम रद्द करणार, कश्मीरला वेगळं अस्तित्व देणार, देशद्रोह केला तरी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणार नाही, सैन्याला दिलेला विशेषाधिकार काढून घेणार मग तिकडे सैनिकांना काय बेचक्या देणार. नशीब…आम्ही सैनिकांना बंदुक़ा देऊ आणि गोळ्या काढून घेऊ इतकेच राहुल गांधी बोलायचे बाक़ी आहेत. अरे राहुल ही इटली नाही हा हिंदुस्तान आहे, अशा खरमरीत शब्दात राहुल गांधीसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सालटी काढली. आणि जनतेलाच प्रश्न केला की, अशी नंपुसकाची औलादीच्या ताब्यात देश द्याल तुम्ही, तर अजिबात नाही.

मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलेय दोनदा सर्जिकल स्ट्राईक केलात आता तिसऱ्यांदा पाकिस्तानचा नामोनिशाना मिटवून टाका, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे ठणकावून सांगताच हिंदुस्तान जिंदाबाद, शिवसेना -भाजप युतीचा विजय असो गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. गुहागर तालुक्यात शुंगारतळी येथे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आम्हाला विचारता लाज वाटते का? त्यापेक्षा शरद पवारांना विचारा सर्वप्रथम वसंतरावांच्या पाठीत खंजीर खूपसून पुलोद स्थापन करून मुख्यमंत्री झाले. तुम्ही गद्दारी केलीत मग सोनिया गांधी विदेशी वाटल्या म्हणून बाहेर पडलात आणि काँग्रेस सोबत गेलात ते तुम्ही आम्हाला विचारता लाज वाटते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला ठणकावून विचारताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आणि पंतप्रधान नरेंद मोदीxनी हातात हात घेतला कारण हे हात मज़बूत आहे आणि या मजबूत हातात तुम्हीं देश देणार आहात. स्वत: शरद पवार म्हणायचे पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लकवा मारलाय जे स्वत:ला आधार देऊ शकत नाही ते काय सरकार चालवणार असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम,महायुतीचे उमेदवार केंद्रीय उद्योगमंत्री अनंत गीते, भाजप नेते राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर,उपनेते आमदार उदय सामंत,पालकमंत्री रवींद्र वायकर, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, नाविद अंतुले, जिल्हासंपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, आमदार भरत गोगावले, सदानंद चव्हाण,भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, जिल्हा सरचिटणीस नीलम गोंधळी, युवासेनेचे प्रांतिक सदस्य योगेश कदम, जिल्हापरिषद उपाध्यक्ष संतोष गोवळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते

अनंत गीतेंचा साष्टांग दंडवत
महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी ही विक्रमी सभा गुहागरात होतेय आज मी भाषण करणार नाही फक्त आशिर्वाद मागणार आहे असे सांगून त्यांनी व्यासपीठावरून साष्टांग दंडवत घातला.