कोल्हापूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. येथे काँग्रेसचे शाहू महाराज आणि मिंधे गटाचे संजय मंडलिक यांच्यात थेट लढत झाली. यात शाहू महाराज यांनी दीड लाख मताधिक्क्याने विजय मिळवला.
शाहू महाराज यांना 7 लाख 45 हजारांहून अधिक मतं मिळाली, तर संजय मंडलिक यांना 5 लाख 94 हजार मतं मिळाली.
कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणूक निकालाच्या मतमोजणी आज मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे 6 हजार 224 मताधिक्याने पुढे आहेत. त्यांना 29604 मते आणि शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांना 23 हजार 380 मते मिळाली आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत शाहू छत्रपती यांनी आघाडी घेतली आहे.
गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सदाशिवराव मंडलिक अपक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ धनंजय भीमराव महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- संजय सदाशिवराव मंडलिक शिवसेना