एक्झिट पोलची भाकितं खरी ठरली तर ईव्हीएममध्ये गडबड, काँग्रेसने राग आळवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. यात एनडीएला सर्वाधिक जागा मिळतील असे वर्तवण्यात आले आहे. एक्झिट पोल समोर आल्यानंतर विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी ईव्हीएमचा राग आळवला आहे. एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलेले आकडे खरे ठरले तर याचा अर्थ ईव्हीएममध्ये नक्कीच गडबड आहे, असे वक्तव्य अल्वी यांनी केले आहे. ‘आज तक‘सोबत बोलताना अल्वी यांनी हे वक्तव्य केले आहे.

एक्झिट पोलचे निकाल सर्व एकतर्फी आहेत. त्यामुळे त्याच्यावर आमचा विश्वास नाही, असे राशिद अल्वी म्हणाले. तसेच एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलेलेच निकाल लागले तर मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये लागलेले निकाल एक षडयंत्र होते असे आमचे मत होईल, असेही ते म्हणाले. तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा विजय म्हणजे ईव्हीएममध्ये गडबड नाही. तसेच त्यांनी (भाजप) असेही दाखवण्याचा प्रयत्न केला की यात निवडणूक आयोगाचीही हात नाही, असेही अल्वी म्हणाले. तसेच एक्झिट पोल वर्तवणाऱ्या कंपन्यांवरही अल्वी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या काही दिवसांपूर्वी या कंपन्यांवर झालेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे सिद्ध झाले ते न्यूट्रल नाही, असेही अल्वी यांनी सांगितले.