शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांच्या डोक्यावर होतोय परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर तुम्ही सकाळ, संध्याकाळ आणि रात्रपाळी अशा तीन शिफ्ट मध्ये काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण ब्रिटनमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनात सतत बदलणाऱ्या शिफ्टचा दुष्परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिकतेवरही होत असल्याचे समोर आले आहे.

सध्याच्या स्पर्धात्मक काळात खासगी कंपन्यांमध्ये 24 तास काम सुरू असते. टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी २४ तास काम करावे अशी कंपन्यांची अपेक्षा असते. त्यातूनच कर्मचाऱ्यांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागेल अशी अट कंपन्या कर्मचाऱ्यांपुढे ठेवतात. या शिफ्ट प्रत्येक आठवड्याला, तर कधी महिन्याला बदलतात. साहजिकच याचा थेट परिणाम शरीरावर होतो. कारण त्यांचा दिनक्रम सतत बदलत असतो. जेणेकरुन या बदलत्या सवयीनुसार शरीराची प्रक्रियाही अनियमित होते. त्याचा परिणाम पचनसंस्थेबरोबरच ,रक्ताभिसरण आणि झोपेवरही होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये वजन वाढणे, चिडचिड होणे, अपुर्ण झोप, अॅसिटीडी, मानसिक ओढाताण अशा समस्या निर्माण होतात. या कर्मचाऱ्यांना डायबिटीसची व्याधीही होते. तर काहीजणांमध्ये मानसिक व्याधीही निर्माण झाल्याचे संशोधनात निदर्शनास आले आहे.

हे संशोधन 438 जणांवर करण्यात आले. यात शिफ्टमध्ये काम करणारे 33 टक्के कर्मचारी मानसिक तणावाबरोबरच नैराश्याने ग्रस्त असल्याचे आढळले.