‘हे’ आहेत 2020 चे लाँग विकेंड, आताच प्लान आखा

11894

2020 या वर्षात सात लाँग विकेंड येत आहेत. या लाँग विकेंडची आम्ही तुम्हाला माहिती दिली असून त्याच्या आधारे तुम्ही आताच तुमचे पुढचे प्लान आखू शकता. हॉटेल, फ्लाईटचे बुकिंग आधीपासूनच केले तर ऐनवेळी होणाऱ्या भाववाढिचा फटका पडणार नाही. तसेच बरंच आधी केल्याने हे स्वस्त देखील मिळतात. चला तर मग जाणून घेऊया या लाँग विकेंड्सबद्दल

21 ते 23 फेब्रुवारी – महाशिवरात्री व शनिवार रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे या दरम्यान तुम्ही लोणावळा, महाबळेश्वर, गोवा, दिल्ली अशा कमी दिवसात होणारे प्लान आखू शकता. यावर्षी गोव्याचा कार्निव्हल देखील 22 ते 25 या दरम्यान होणार आहे.

goa

7 ते 10 मार्च – होळी स्पेशल या विकेंडमध्ये फक्त एक सोमवारची रजा टाकलीत तर तुम्हाला शनिवार ते मंगळावर अशी चार दिवसांची रजा मिळू शकते. या चार दिवसात तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरू शकता.

(सर्व फोटो- संजय दस्तुरे)
(सर्व फोटो- संजय दस्तुरे)

4 ते 6 एप्रिल – एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात चाकरमान्यांना शनिवार रविवार व महावीर जयंती अशी तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. एप्रिल म्हटलं की उन्हाळा त्यामुळे एखाद्या रिसॉर्टवर निवांतपणे तुम्ही ही सुट्टी एन्जॉय करू शकता.vasai-resort

10 ते 14 एप्रिल – एप्रिल हा महिना नोकरदारांसाठी बऱ्याच सुट्ट्या घेऊन आला आहे. पहिल्या आठवड्यात लाँग विकेंड झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही शुक्रवारी गुड फ्रायडे त्यानंतर शनिवार रविवार असा लाँग विकेंड तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही 13 एप्रिल सोमवारी सुट्टी टाकू शकलात तर 10 ते 14 एप्रिल अशी पाच दिवसांची सुट्टी तुम्हाला मिळणार असून त्यात तुम्ही कुटुंबासोबत देशाअंतर्गत तसेच दुबई, बाली, श्रीलंका, मालदिव, मॉ़रिशिअस अशा देशांना भेट देऊ शकता.

maldives

23 ते 25 मे – मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात शनिवार रविवार व सोमवारी रमजान ईद असे तीन दिवस सलग रजा मिळणार आहेत. या तीन दिवसांत तुम्ही एखाद्या जवळपासच्या हिलस्टेशनलाही भेट देऊ शकता

mahabaleshwar-1

31 जुलै ते 3 ऑगस्ट – 31 जुलैला बकरी ईद त्यानंतर येणारे शनिवार रविवार व 3 ऑगस्टला रक्षाबंधन. रक्षाबंधनची एक रजा टाकून तुम्ही तुमच्या भावंडांसोबत मस्त एक पावसाळी ट्रीप प्लान करू शकता.

khandala-1

25 ते 27 डिसेंबर – 25 डिसेंबर ला ख्रिसमस व त्याला जोडून आलेले शनिवार रविवार असे सलग तीन दिवस सुट्टीचे मिळणार आहेत. त्यामुळे या तीन दिवसात तुम्ही गोव्याचा प्लान सहज करू शकता. त्यात ख्रिसमसमध्ये गोव्याला जाण्याची धम्माल काही वेगळीच

goa-christhmas-1

आपली प्रतिक्रिया द्या