जगातील सर्वात लांब पापण्या, महिलेचा फोटो होतोय व्हायरल!

सोशल मीडियावर सध्या जगातील सर्वात लांब पापण्या असलेल्या महिलेचा फोटो व्हायरल होतोय. या महिलेच्या पापण्या इतक्या मोठय़ा आहेत की चक्क त्यांची वेणी घालावी लागते.

चीनमधील यू या महिलेचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. 2016मध्ये तिच्या पापण्या 4.88 इंच लांब होत्या. मात्र आता तिनं स्वत:चाच रेकॉर्ड तोडला आहे. आता तिच्या पापण्या 20.5 इंच लांब झाल्या आहेत. तिची अशी अवस्था का आहे, याचा तपास अद्याप डॉक्टरही लावू शकलेले नाहीत. तिच्या पापण्या गालाच्या खालीपर्यंत पोहोचल्या आहेत. ती म्हणाली की, माझ्या पापण्या आधी इतक्या लांब नव्हत्या. 2015मध्ये मी डोंगराळ भागात दीड वर्ष राहिली. तिथून परतल्यानंतर माझ्या पापण्या अत्यंत वेगानं वाढू लागल्या. तिला असं वाटतं की, या पापण्यांमुळे तिच्यातील शक्ती आणखी वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या