
आज लागणारे सूर्यग्रहण हे वर्षातले पहिले आणि मागच्या 54 वर्षांतले सर्वात मोठे सूर्यग्रहण असणार आहे. हिंदुस्थानात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. उत्तर अमेरिकेच्या काही भागात खग्रास सूर्यग्रहण दिसेल आणि चार मिनिटे 9 सेकंद या ठिकाणी पूर्ण अंधार असेल. दरम्यान, नासाच्या वैज्ञानिकांनी यावेळी अनेक प्रयोग करण्याच्या योजना आखल्या आहेत.
अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरात सूर्यग्रहणाबाबत लोकांमध्ये फार उत्साह आहे आणि लोकांनी हे सूर्यग्रहण पाहाण्यासाठी वेगवेगळी तयारी केली आहे. आज लागणारे सूर्यग्रहण कॅनडा, अमेरिकेपासून मॅक्सिकोपर्यंत दिसेल. हे सूर्यग्रहण हिंदुस्थानी वेळेनुसार रात्री 9 वाजून 12 मिनिटांपासून मध्यरात्री 2 वाजून 22 मिनिटांपर्यंत होणार. मात्र 5 तास 10 मिनिटे चालणारे हे सूर्यग्रहण हिंदुस्थानात दिसणार नाही.
हे सूर्यग्रहण 5 तास 10 मिनिटांचे असणार आहे. 4 मिनिटे 9 सेकंद खग्रास सूर्यग्रहण असणार. हे सूर्यग्रहण कॅनडा, उत्तर अमेरिका, मॅक्सिको, कोस्टारिकामध्ये पाहिले जाऊ शकते. सोबत क्यूबा, डोमिनिका, फ्रेन्च पोलिनेशिया, जमैका या भागात दिसणार आहे. दक्षिण प्रशांत महासागरापासून ग्रहणाला सुरुवात होणार. सर्वात जास्त वेळ चालणाऱ्या या ग्रहणासाठी नासाने खास तयारी केली आहे.



























































