
पेटीएम अॅपवरून एलपीजी सिलेंडर बुक करणाऱ्यांसाठी कंपनीने एका खास ऑफरची घोषणा केली आहे. आता पेटीएम अॅपवरून एलपीजी सिलेंडर बुक केल्यास तुम्हाला 2,700 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. यासाठी पेटीएम कंपनीने ‘3 पे 2700 कॅशबॅक’ ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर केवळ नवीन ग्राहकांसाठी वैध आहे.
पेटीएमच्या या ऑफरमध्ये पहिल्या तीन महिन्यांसाठी दरमहा 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जाईल. पेटीएमची 3 पे 2700 कॅशबॅक ऑफर 3 प्रमुख एलपीजी कंपन्या इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅससाठी आहे.
कॅशबॅक व्यतिरिक्त पेटीएम आपल्या युजर्सला Buy Now Pay Later ची सुविधाही देणार आहे. म्हणजेच तुम्ही चालू महिन्यात सिलेंडर ऑर्डर केल्यास, त्याचे पैसे तुम्ही पुढील महिन्यात पुन्हा सिलेंडर ऑर्डर केल्यास भरू शकता. यासाठी युजर्सला Paytm Now Pay Later (Paytm Postpaid) घ्यावा लागणार आहे.
पेटीएमने असं करा गॅस बुकिंग
पेटीएम वरून गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी युजर्सला अॅपवर जाऊन Book Gas Cylinder ऑप्शनवर जावं लागणार आहे. येथे त्यांना गॅस प्रोव्हायडर निवडायचा आहे. यानंतर मोबाईल नंबर, एलपीजी आयडी किंवा ग्राहक क्रमांक टाकावा लागणार आहे. तपशील भरल्यानंतर युजर्सला पेमेंट करावे लागेल. यासाठी ते पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड किंवा नेटबँकिंगचा वापरू शकतात. पेटीएमने गेल्या वर्षी गॅस बुकिंग सुविधा सुरू केली होती.




























































