
इशान किशन आणि रोहित शर्माच्या 90 धावांच्या दमदार सलामीमुळे मुंबईने सामन्यावर पकड निर्माण केली होती, पण विजय आवाक्यात असताना मुंबईच्या मधल्या फळीने केलेली निराशा आणि नव्या दमाच्या मोहसीन खानने शेवटच्या षटकांत केलेल्या अचूक माऱ्यामुळे लखनौने अवघ्या 5 धावांनी हसीन विजय मिळविला. या विजयामुळे लखनौ 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून सात संघांना प्ले ऑफमध्ये धडक मारण्याची संधी अजूनही कायम राहिली आहे.
मार्कस स्टॉयनीसच्या 89 धावांच्या तुफानी खेळीमुळे लखनौने 178 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईला कधी नव्हे ती रोहित शर्मा आणि इशान किशनने जोरदार सुरुवात करीत मुंबईची सामन्यावर पकड मजबूत केली. पण रोहित 37 धावांवर बाद होताच मुंबईच्या डावाला नजर लागली आणि सूर्यकुमार यादव (7), नेहाल वढेरा (16), विष्णू विनोद (2) यांनी घात केला. त्यामुळे मुंबईसमोरचे लक्ष्य वाढू लागले. 2 षटकांत 30 धावांची गरज असताना नवीन उल हकच्या गोलंदाजीवर 2 षटकार खेचत टीम डेव्हिडने सामना मुंबईच्या बाजूने वळवला. 19 व्या षटकांत नवीनने 19 धावा दिल्या. त्यामुळे मुंबईला 6 चेंडूंत 11 धावा करायच्या होत्या. तेव्हा मोहसीन खानने भेदक मारा करीत ग्रीन आणि डेव्हिडला जखडून ठेवत केवळ 5 धावा देत लखनौला 5 धावांनी थरारक विजय मिळवून दिला. मुंबईला 172 धावांपर्यंतच पोहोचता आले.
तत्पूर्वी, आघाडीच्या तिन्ही फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर मार्कस स्टॉयनीसच्या घणाघाती 89 धावांच्या नाबाद खेळीने लखनौला 3 बाद 177 अशी दमदार मजल मारून दिली. स्टॉयनीसला कर्णधार कृणाल पंडय़ाचीही सुरेख साथ लाभली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 82 धावांची भागी रचली. 42 चेंडूंत 49 धावांची संयमी खेळी केल्यानंतर पंडय़ा (जखमी) निवृत्त झाला. त्याने या खेळीत केवळ एक चौकार आणि एक षटकार मारला. 35 चेंडूंत 45 धावा करणाऱ्या स्टॉयनीसने पुढील 12 चेंडूंत 44 धावा चोपल्या.
संक्षिप्त धावफलक ः n लखनौ सुपर जायंट्स ः 20 षटकांत 3 बाद 177 (क्विंटन डिकॉक 16, कृणाल पंडय़ा जखमी निवृत्त 49, मार्कस स्टॉयनीस ना. 89; जेसन बेहरनडॉर्फ 4-0-30-2, पीयूष चावला 3-0-26-1). n मुंबई इंडियन्स ः 20 षटकांत 5 बाद 172 (इशान किशन 59, रोहित शर्मा 37, टीम डेव्हिड ना. 32, यश ठाकूर 4-0-40-2, रवी बिष्णोई 4-0-26-2).
आयपीएल गुणतालिका
संघ सा. वि. प. ने. र. गुण
गुजरात 13 9 4 0.835 18
चेन्नई 13 7 5 0.381 15
लखनौ 13 7 5 0.304 15
मुंबई 13 7 6 -0.128 14
बंगळुरू 12 6 6 -0.166 12
राजस्थान 13 6 7 0.140 12
कोलकाता 13 6 7 -0.256 12
पंजाब 12 6 6 -0.268 12
हैदराबाद 12 4 8 -0.575 8
दिल्ली 12 4 8 -0.686 8
टीप ः सा-सामना, वि-विजय, प-पराजय,ऩे र.- नेट रनरेट
ही आकडेवारी मुंबई- लखनौपर्यंतची आहे.
अव्वल फलंदाज
फलंदाज सा. धावा सरासरी 4 6
डय़ुप्लेसिस 12 631 57.36 48 34
शुभमन 13 576 48.00 62 14
जैस्वाल 13 575 47.91 74 26
कॉन्वे 13 498 49.80 58 13
सूर्यकुमार 13 486 40.50 52 24
अव्वल गोलंदाज
गोलंदाज सा. वि. सरासरी 4 वि. 5 वि.
शमी 13 23 16.73 2 0
राशीद 13 23 18.78 1 0
चहल 13 21 18.66 3 0
चावला 13 20 19.14 0 0
वरुण 13 19 20.57 1 0


























































