
दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या हिंदुस्थानी संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ‘मॅकअफी मोस्ट डेंजरस सेलिब्रिटी लिस्ट’मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ‘मॅकअफीच्या संशोधनामध्ये ज्या लोकप्रिय मान्यवरांचा ऑनलाइन शोध सर्वात धोकादायक ठरू शकतो अशांची नावे पुढे आली आहेत. ही नावे ही त्यांच्या चाहत्यांना फसवणूक करणाऱ्या वेबसाइट आणि व्हायरस यांच्या संकटात टाकू शकतात.






























































