
‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिला नवनवीन कला शिकायला आकडतात. अभिनय आणि नृत्यकलेत पारंगत असलेल्या माधुरीने स्वयंपाकाची कलाही चांगली अवगत केली आहे. चांगली कुक अशी स्वतःची ओळख तिने बनवली आहे. गेल्यावर्षी माधुरीने श्रीलंकेत कुकींगेच धडे घेतले होते आणि त्याचाच उपयोग आता लॉकडाऊनमध्ये झाल्याचे ती सांगते.
The Sri Lankan cooking class we took last year has definitely come in handy during this lockdown What cuisine do you guys enjoy the most? #ExperiencesOverThings⚡ pic.twitter.com/ygyAEZ0ZPd
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) August 19, 2020
श्रीलंकेत माधुरी जे पाककौशल्य शिकली होती, तेच वेगवेगळे पदार्थ तिने लॉकडाऊनमध्ये घरी बनवले. माधुरीने स्वतः ही माहिती सोशल मीडियावर फोटो शेअर करून दिली. तसेच तुम्हाला कोणती डिश सर्वात जास्त आवडते, असा सवालही तिने चाहत्यांना केलाय. तिच्या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देत अनेकांनी आवडत्या डिशचे नाव कमेंटमध्ये लिहिलंय.





























































