
दिल्ली-मुंबई महामार्गावर कार रोखत खुलेआम महिलेसोबत रोमान्स करणारे मध्य प्रदेशमधील भाजप नेते मनोहरलाल धाकड यांना पोलिसांनी अटक केली आहे. धाकड यांचा एक व्हिडीओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ते महामार्गावर कार रोखत खुलेआम महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना दिसत होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.
मनोहरलाल धाकड यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, रस्त्याच्या कडेला कार उभी आहे. मोहनलाल धाकड कारमधून उतरून महिलेसोबत रस्त्यावरच खुलेआम शरीरसंबंध ठेवताना दिसत आहेत. ही घटना 13 मे 2025 रोजी 8.26 वाजता घडली. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर भानुपरा पोलिसांनी धाकड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, मोहनलाल धाकड हे उज्जैनमधील धाकड महासभेचे महामंत्री आहेत. पण सदर प्रकरणानंतर धाकड महासभेने त्यांना पदावरून निलंबित केले आहे. धाकड यांच्या पत्नी भाजप समर्थित जिल्हा पंचायत सदस्या असून मंदसौर जिल्हा पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 8 मधून त्या निवडून आल्या आहेत.