भाजपाच्या माजी आमदाराच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांचा शोध सुरू

suicide

मध्य प्रदेशातील रतलाम येथील भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाचा मृतदेह शेतातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. हे प्रकरण रतलामच्या कुंडाल गावात घडले आहे. भाजपचे माजी आमदार मथुरालाल डामोर हे कुटुंबासोबत कुंडाल या गावात राहतात. गुरुवारी सकाळी मथुरालाल यांच्या जगदीश या मुलाचा त्यांच्याच शेतात एका झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. ह्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी मृतदेह खाली उतरवला आणि शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे.

घटनास्थळी पोलीस तपास करत असताना कोणत्याही प्रकारची आत्महत्या केल्याचे चिठ्ठी आढळली नाही. पोलीस ह्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

भाजपाचे माजी आमदार मथुरालाल डामोर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा सकाळी साडे नऊ वाजता घरातून बाहेर पडून शेतात गेला होता. 11 वाजता मुलाचा मृतदेह झाडाला लटकल्याची माहिती मिळाली. गावकऱ्यांनी झाडावर मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यावर घरातल्यांना सांगितले.

बिलपांक पोलीस सर्वबाजूंनी या घटनेचा तपास करत आहेत. आत्महत्या केलेल्या जगदीशला पत्नी आणि 7 मुले आहेत. मृत जगदीशच्या लहान भावाने सांगितले की त्याचे कोणासोबत वैर नव्हते. भावाने असे का केले हे काही माहित नाही.

रतलाम पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, माजी आमदार मथुरालाल डामोर यांच्या मोठ्या मुलाने आत्महत्या करणार असल्याची सूचना दिली होती अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. सध्या ह्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या