
मध्यप्रदेशात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेने रात्रीच्या अंधारात शेजारी नवरा झोपला समजून भलत्याचसोबत सेक्स केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेने पोलीस स्थानकात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली असून तरुण फरार आहे.
मऊगंज परिसरात एका 27 वर्षीय महिलेने तिच्यावर बलात्कार झाल्याची पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तिने तक्रारीत म्हंटलंय की, 13 मे रोजी महिला आपला पती आणि पाच वर्षीय मुलासोबत झोपड्यात झोपली होती, दरम्यान मध्यरात्री एक तरुण त्यांच्या झोपडीत शिरला आणि तिच्यासोबत शारिरीक संबंध केले. महिलेनेही तिचा नवरा समजून त्याला विरोध केला नाही. दरम्यान तिच्या दुसऱ्या बाजूला नवरा असल्याचे लक्षात आल्यावर तिने आरडाओरड केला. त्यामुळे नवराही जागा झाला. त्याने त्या तरुणाला पकडले मात्र तो हातातून निसटून गेला. याप्रकरणी घाबरलेल्या महिलेने सकाळी पोलीस स्थानकात पोहोचून तक्रार दाखल केली. मात्र बलात्काराचा आरोप असलेला तरुण फरार असून त्याचा तपास सुरू आहे.
पीडित महिलेसोबत पोलीस घटनास्थळाची पाहणी करायला गेले असता. पोलिसांना बलात्कार झाला की नाही याबाबत संशय आहे. पीडित महिला ज्या झोपडीत राहते ती फार लहान आहे. जी त्या तिघांसाठीही लहान आहे. तिथेच महिला तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगतेय. जर तिथेच बलात्कार झाला तर नवऱ्याला कसे कळले नाही याबाबत पोलिसांना संशय आहे. शिवाय महिलेच्या पतीचे त्या तरुणासोबत वाद सुरू होते. पोलिसांना या घटनेबाबत नेमका अंदाज बांधता येत नसून हे प्रकरण महिला एसआय यांच्याकडे सोपवण्याच आले असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यावर एफआयआर नोंदवण्यात येईल अशी माहिती मऊगंज ठाण्याचे एएसपी विजय डाबर यांनी दिली.




























































