देवा तुझी सोन्याची जेजुरी !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबारायाची माघी पौर्णिमा यात्रा अलोट उत्साहात पार पडली. गेले तीन दिवस जेजुरी नगरी भाविकांनी फुलून गेली होती. पौर्णिमेच्या दुसऱया दिवशी सोमवारी परंपरेनुसार मानाच्या शिखरी काठय़ा खंडोबाला भेटल्या. यावेळी ’येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करत भंडाऱयाची मुक्त उधळण करण्यात आली. त्यामुळे जेजुरी गडाला सोनेरी झळाळी मिळाली आणि अवघे वातावरण भक्तीमय बनले. यात्रेसाठी मुंबई आणि किनारपट्टी भागातून मोठय़ा प्रमाणात कोळी बांधवही दाखल झाले होते.

(छायाः महेश शिंदे)