अखेर धनंजय मुंडे बोलले… मी पवारांसोबतच, संभ्रम निर्माण करू नका!

राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातून विजय मिळवला असून त्यांना मंत्रीपद मिळाले आहे.

सत्तासंघर्षाच्या नाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार धनंजय मुंडे यांनी अखेर मौन सोडले आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबतच आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. तसेच कृपया कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करू नये, अशी विनंतीही धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे.

dhananjay-munde

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी एकामागोमाग एक ट्वीट करून मोदी, शहा यांच्यासह भाजप नेत्यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी मी राष्ट्रवादीसोबत असून शरद पवारच आपले नेते आहेत, असे ट्वीट केले. तसे भाजप आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राला पुढील 5 वर्षे टिकणारे स्थिर सरकार देईल, असेही त्यांनी म्हटले. तसेच घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सर्व काही ठिक आहे. फक्त थोडा धीर धरा. तुमच्या पाठिंब्याबाबत धन्यवाद, असे दुसरे ट्वीट अजित पवार यांनी केले. या ट्वीटमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. परंतु काही वेळातच शरद पवार यांनी ट्वीट करून अजित पवार यांच्या विधानाची चिरफाड केली आहे.

https://www.saamana.com/maha-political-twist-shiv-sena-ncp-congress-ahmed-patel-jw-marriott-hotel/

आपली प्रतिक्रिया द्या