महाड इमारत दुर्घटना – मुख्य आरोपी फारूक काझीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

824

महाड मधील तारिक गार्डन इमारत दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी फारूक काझी याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आठवडा भरापूर्वी फारूक माणगाव सत्र न्यायालयाला शरण आल्यानंतर त्याला महाड शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर महाड प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज ही मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेंव्हा फारुकच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.

दरम्यान या प्रकरणात 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 24 ऑगस्ट रोजी दुर्घटना घडली यात 40 हुन अधिक संसार उध्वस्त झाले, तर 16 जणांना आपला जीव गमवावा लागला. तेंव्हापासून फारूक फरार होता.

अटक पूर्व जामिनासाठी धडपड सुरू असताना  3 सप्टेंबर रोजी तो माणगाव सत्र न्यायालयासमोर हजर झाला. तेंव्हा न्यायालयाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. महाड प्रथमवर्ग न्यायालयाने त्याला 7 दिवस पोलीस कोठडी दिली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने त्याला आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

सुनावणीच्या वेळी फारूकचे वकील ऍड .विलास नाईक यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यात आतापर्यंत फारुकसह आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे व फारुकचा सहकारी युनूस शेख या तिघांना अटक झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या